अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी !

एस् टी. कर्मचाऱ्यांचे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी १३ एप्रिलपर्यंत वाढण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एस्. टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती.

प्राज्ञ पाठशाळा मंडळ महत्त्वाची संस्था ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

ते म्हणाले, प्राज्ञ पाठशाळेच्या कार्याला महाविकास आघाडी सरकार योग्य ते अर्थसाहाय्य करेल. संस्थेच्या इमारतीच्या बांधण्याविषयी आम्हीही कटीबद्ध आहोत.

सातारा येथील जिहे-कठापूर योजनेसाठी केंद्र सरकारकडून २४७ कोटी रुपये !

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना जलपूजनाचे निमंत्रण

आय.एन्.एस्. विक्रांत जहाजाच्या संवर्धनासाठी किरीट सोमय्या यांनी जमवलेले पैसे पक्षाला दिले !

सरकारी अधिवक्ता प्रदीप घरत यांची माहिती

देवघर (झारखंड) येथे ‘रोप-वे’च्या अपघातात दोघांचा मृत्यू

राज्यातील देवघर येथील त्रिकुट पर्वतावर ‘रोप-वे’ची एकमेकांना धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. सैन्य, हवाई दल आणि ‘राष्ट्रीय आपत्ती प्रसारण दल’ (‘एन्.डी.आर्.एफ’) हे बचावकार्य करत आहेत. शेवटची बातमी हाती आली, तोपर्यंत १२ भाविकांची सुटका करण्यात आली होती.

किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांच्या अधिवक्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

संभाजीनगर येथे रात्री १० वाजल्यानंतर मशिदींचे भोंगे वाजले, तर ते काढून फेकणार !

करणी सेनेचे सूरजपालसिंह अम्मू यांची चेतावणी

पुणे येथील खडक पोलीस ठाण्यात ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन !

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासठी सरकारी निधीतूनच बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये ‘इफ्तार पार्टी’ आयोजित केली जाते; मात्र हिंदूंच्या कोणत्याही सणाला सरकारी निधीतून साहाय्य केल्याचे ऐकिवात नाही.

(म्हणे) ‘सत्तेत असलेल्या लोकांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा प्रचार केला !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

आतापर्यंत धर्मांधांनीच जातीय दंगली घडवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, हे हिंदू ओळखून आहेत. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी त्यांना झुकते माप देत केवळ हिंदूंवर टीका करणारे शरद पवार !