मानखुर्द (मुंबई) येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या हिंदूंवर धर्मांधांकडून तलवारी-काठ्या यांनी आक्रमण !

श्रीरामनवमीच्या रात्री घडला प्रकार !

  • ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यावर विरोध होऊन हिंसा भडकण्यासाठी हा भारत आहे कि पाकिस्तान ? – संपादक
  • या आक्रमणावरून ‘हिंदूंना वाली कोण ?’ असा प्रश्न उपस्थित होतो.  ही आक्रमणे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन हवे ! – संपादक
  • हिंदूंच्याच सण-उत्सवांच्या वेळी धर्मांधांकडून हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमण केले जाते, यावरून हे पूर्वनियोजित षड्यंत्र नसेल कशावरून ? – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई, ११ एप्रिल (वार्ता.) – मानखुर्द येथे ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देणाऱ्या हिंदूंवर धर्मांधांनी श्रीरामनवमीच्या रात्री जीवघेणे आक्रमण केले. ‘रमजान चालू है, नारे मत लगाओ’, असे म्हणत धर्मांधांनी हिंदु युवकांवर तलवारी आणि लाठ्या यांनी आक्रमण केले. (धर्मांधांच्या प्रार्थनेचा भोंग्यांवरील कर्णकर्कश आवाज प्रत्येक दिवशी ५ वेळा, असे ३६५ दिवस हिंदूंना ऐकावा लागतो. हिंदूंनी मात्र त्यांच्या देवतांच्या घोषणा दिल्यास त्यांच्यावर आक्रमण करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. अशा धर्मांधांवर पोलीस कारवाई कधी करणार ? – संपादक) यामध्ये सोनू चौधरी आणि आणखी एक हिंदु युवक गंभीर घायाळ झाले. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी एका धर्मांधासह १५ अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या वेळी शेकडो धर्मांध घटनास्थळी जमले. या घटनेनंतर रात्री उशिरा संतप्त हिंदूही रस्त्यावर उतरले. जमावाने वाहनांची तोडफोड केली.

श्रीरामनवमीच्या दिवशी चेंबूर येथील श्री साईबाबा मंदिरात भंडाऱ्यासाठी गेलेले युवक रात्री दुचाकीने परतत असतांना मानखुर्द, म्हाडा वसाहतीत त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्या वेळी २०-२५ च्या संख्येने असलेल्या धर्मांधांनी हिंदु युवकांना अडवून त्यांच्यावर तलवारी आणि काठ्या यांनी जीवघेणे आक्रमण केले. सोनू चौधरी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये ‘ईर्शाद याने हातात तलवार घेऊन ‘सालो छोडेंगे नही, तुमको काट डालेंगे’, अशी धमकी दिली. (यावरूनच धर्मांधांची हिंसक मानसिकता दिसून येते ! – संपादक) मानखुर्द येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

रिक्शातून तलवारी घेऊन आक्रमण केल्याची प्रत्यक्षदर्शी हिंदूंची माहिती !

प्रत्यक्षदर्शी हिंदूंनी दिलेल्या माहितीनुसार एका रिक्शातून आणलेल्या तलवारींनी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. हिंदु युवकांना फरफटत नेऊन त्यांना लाठ्यांनी मारहाण केली. या वेळी धर्मांध ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत होते.

गुन्हा नोंदवण्यास पोलिसांकडून विलंब !

या घटनेनंतर रात्री १ वाजता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात जाऊन झालेल्या प्रकाराविषयी तक्रार करून गुन्हा नोंदवण्याची विनंती केली. आक्रमणकर्त्या धर्मांधांवर गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरूनही गुन्हा नोंदवण्यास पोलिसांनी नकार दिला. ‘मारहाण झालेली व्यक्ती तक्रार करत नाही, तोपर्यंत गुन्हा नोंदवणार नाही’, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. (हा पोलिसांचा आडमुठेपणा नव्हे का ? – संपादक) ज्या हिंदु युवकांना मारहाण झाली, त्यांतील एका युवकाने भयामुळे रहात्या घरातून पलायन केले आहे. (हिंदूबहुल महाराष्ट्रात असे होणे दुर्दैवी ! – संपादक) सोनू चौधरी यांनी ११ एप्रिल या दिवशी धीर एकवटून तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

हिंदूंसमवेत झालेल्या आक्रमणाच्या बातम्या नाहीत; मात्र हिंदूंनी आक्रमण केल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित !

हिंदूंशी दुजाभाव करणाऱ्या वृत्तवाहिन्यांचा जाहीर निषेध ! अशांवर हिंदूंनी बहिष्कार टाकल्यासच त्या सुतासारख्या सरळ होतील, हे लक्षात घ्या ! – संपादक

१० एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी हिंदूंना केलेल्या मारहाणीविषयी छोटीशी बातमीही वृत्तवाहिन्यांवरून देण्यात आली नाही; मात्र हिंदूंवर झालेल्या जीवघेण्या आक्रमणानंतर रस्त्यावर उतरलेल्या हिंदूंचे ‘व्हिडिओ फूटेज’ वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आले. ‘टी.व्ही.९ मराठी’, ‘एबीपी न्यूज’, ‘एबीपी माझा’, ‘न्यूज १८ लोकमत’, ‘झी २४ तास’, आदी मराठी आणि हिंदी वृत्तवाहिन्यांवर हिंदू आक्रमक होऊन रस्त्यावर उतरल्याचे व्हिडिओ दाखवण्यात आले; मात्र ज्या कारणामुळे हिंदू रस्त्यावर उतरले, त्याचा साधा उल्लेखही कोणत्याच वृत्तवाहिनीने केला नाही.

महाराष्ट्रात जाती-धर्माच्या नावाखाली दंगल भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल. आपल्या देशात सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र रहाण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. राजकीय लाभासाठी २ समाजांत भांडण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांच्या समस्या सोडवायला हव्यात; मात्र सद्य:स्थितीत महाराष्ट्रात जाती-धर्माच्या नावाखाली दंगल भडकावण्याचा प्रयत्न चालू आहे.