वायूप्रदूषणामुळे प्रत्येक मिनिटाला जगातील १३ लोक पडतात मृत्यूमुखी !

‘वायूप्रदूषण’ हे जागतिक मृत्यूंचे मुख्य कारण असून यामुळे प्रतिवर्षी ७० लाखांहून अधिक लोक गमावतात प्राण !

विज्ञान हे मनुष्याला साहाय्यकारी ठरण्याऐवजी विनाशकारीच ठरत आहे, असेच या आकडेवारीतून सिद्ध होते ! सनातन धर्माचे अधिष्ठान घेऊन भौतिक प्रगती साधणे, हाच या भयावह जागतिक समस्येवरील एकमेव उपाय असल्याचे जाणा !

जागतिक वायूप्रदूषणाची धक्कादायक आकडेवारी !

  • वायूप्रदूषण हे जगातील मृत्यूंचे प्रमुख कारण !
  • बाहेरील आणि घरातील वायूप्रदूषणामुळे प्रत्येक वर्षी ७० लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी !
  • जगातील ९१ टक्के लोकसंख्येचे प्रदूषणाच्या तीव्र पातळीच्या क्षेत्रांत वास्तव्य ! ही क्षेत्रे विकसनशील देशांत येतात.
  • स्वयंपाकाच्या आगीतून निघणाऱ्या धुरामुळे प्रतिवर्षी ३८ लाख लोकांचा अकाली मृत्यू !
प्रतिकात्मक छायाचित्र

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – जगभरात वायूप्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने फुप्फुसांचा कर्करोग, हृदयविकार आणि पक्षाघात यांसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढला आहे. यामुळे प्रत्येक मिनिटाला कमीतकमी १३ लोक त्यांचे प्राण गमावत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (‘डब्ल्यू.एच्.ओ’ने) ट्वीट करून ही धक्कादायक माहिती दिली.

तेल, कोळसा आणि नैसर्गिक वायू यांसारखी इंधने जाळल्यामुळे वायूप्रदूषण होते. ते तातडीने थांबवण्याची आवश्यकता असल्याची चेतावणी संघटनेने दिली.

वायूप्रदूषण न्यून करावेच लागणार ! – डब्ल्यू.एच्.ओ

‘कोरोना काळात ‘आपल्याला आपले फुप्फुस किती अशक्त आहे’ याचा अनुभव आला. कोरोना हा श्वास आणि फुप्फुस यांच्याशी जोडलेला आजार होता. ज्याचे फुप्फुस अशक्त आहे, त्याला कोरोना झाल्यावर त्याला त्याच्याशी झुंजावे लागले होते. यामुळे पुढे होणाऱ्या रोगांपासून वाचण्यासाठी वायूप्रदूषण हे न्यून करावेच लागणार आहे’, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.