न्यायालयाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

धार्मिक स्थळांवर भोंगे लावू नयेत, असा सर्वाेच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतांना उपमुख्यमंत्र्यांची भूमिका मात्र गुळमुळीत !

रा.स्व. संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंच आयोजित इफ्तार पार्ट्यांमध्ये स्वयंसेवकांनी सहभागी व्हावे !

यापूर्वी या इफ्तार पार्ट्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीने होत असल्या, तरी त्यामध्ये संघ स्वयंसेवक प्रत्यक्ष सहभागी होत नव्हते. या वर्षी मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इफ्तार पार्ट्यांमध्ये स्वयंसेवकांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे

खटल्यांची वेळेवर सुनावणी न होणे ही भारतीय न्यायव्यवस्थेतील कायमची समस्या ! – न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे

न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे खटले, जामिनाचे खटले आणि त्यामुळे बंदीवानांना नाहक होणारा कारावास यांमुळे न्यायव्यवस्थेला दोष दिला जातो; परंतु सुनावणीसाठी अधिवक्ते वारंवार स्थगिती मागतात.

चैत्र शुक्ल प्रतिपदेला नववर्ष साजरे करण्यामागे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत !  – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गुढीपाडवा’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !

विशाखापट्टणम् येथील सनातन धर्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रामजन्मभूमीचा खटला लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् यांना देण्यात आला पुरस्कार !

रामजन्मभूमीचा खटला लढून तो आम्ही जिंकणे, ही ईश्वराची योजना होती आणि मी त्याच्या चरणी सेवा करत होतो. रामजन्मभूमीचा खटला लढणे, हे कार्य एका व्यक्तीचे नाही, तर ते सांघिक कार्य होते. या खटल्यात मला साहाय्य करणार्‍या अधिवक्त्यांचा चमू हा रामायणातील वानर सेनेसारखा असून त्यांनी त्यांच्याप्रमाणेच सेवा केली आहे.

भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे ‘चैत्र शुद्ध प्रतिपदे’ला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

हिंदु बांधवांनी भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने देशभरातील विविध राज्यांत सोशल मिडिया, फलक प्रसिद्धी, व्याख्याने आदी माध्यमांतून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार नववर्ष साजरे करण्याला कुठलाही ठोस आधार नाही ! – आचार्य अशोककुमार मिश्र, अध्यक्ष, वर्ल्ड ॲस्ट्रो फेडरेशनचे एशिया चॅप्टर, बिहार

चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच हिंदु नववर्ष का साजरे करावे ? याविषयीचे शास्त्र जाणून हिंदु बांधवांनी समाजाचे आणि आपल्या धर्मबंधूंचे प्रबोधन करावे.

मराठी साहित्य संमेलनात जनतेच्या पैशांची उधळपट्टी !

संमेलनातील मंडप आणि कमानी यांवर १ कोटी ६१ लाख ७० सहस्र ९७० रुपये, तर रांगोळीवर १ लाख २२ सहस्र रुपये व्यय झाल्याचे संमेलनाच्या ताळेबंदातून निदर्शनास आले. त्यामुळे संमेलनाच्या स्वागत समितीच्या सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गुढीपाडव्यापासून चालू होणार पुणे येथील ज्ञानेश्‍वर माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन !

सध्या कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने २ एप्रिलपासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी ६ वाजल्यापासून समाधी स्पर्श दर्शन चालू करण्याचा निर्णय देवस्थानने एका विशेष बैठकीमध्ये घेतला आहे.