‘हिंदु नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला का साजरे करावे ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
मुंबई – ज्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, त्या शुभ दिवशी हिंदु नववर्ष साजरे केले जाते. या दिवशी नववर्ष साजरे करणे वैज्ञानिक, प्राकृतिक आणि सामाजिक दृष्टीने योग्य आहे, तसेच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा उत्तम आहे; मात्र ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार नववर्ष साजरे करण्याला कुठलाही ठोस आधार नाही, असे प्रतिपादन बिहार येथील ‘वर्ल्ड ॲस्ट्रो फेडरेशनचे एशिया चॅप्टर’चे अध्यक्ष आचार्य अशोककुमार मिश्र यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला का साजरे करावे ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित केला होता. त्यामध्ये ते बोलत होते.
देहली येथील वैज्ञानिक, विचारक आणि लेखक डॉ. ओमप्रकाश पांडे म्हणाले, ‘‘हिंदु नववर्षाच्या दिवशी शुभसंकल्प केला जातो. पाश्चात्त्यांनी पुष्कळ वर्षांपूर्वी मार्च मासापासूनच नववर्ष प्रारंभ केला होता. आताही अनेक विदेशी नागरिक एप्रिलच्या प्रारंभी एकमेकांना रंग भेट देतात. कालचक्राचा अभ्यास केल्यास ‘चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्ष का साजरे केले जाते ?’ हे लक्षात येईल.’’
हे पहा –
♦ हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ में “‘हिंदु नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला का साजरे करावे ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !”
🌸 हिंदु नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला (गुढीपाडव्याला) का साजरे करावे ? #GudhiPadwa #गुढीपाडवा #HinduNewYear https://t.co/JgKV2hGX80
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) March 31, 2022
_______________________________________________
सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर म्हणाल्या, ‘‘हिंदु नववर्षाला भारतात राज्यपरत्वे वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. हिंदु नववर्षाच्या कालावधीत आपण निसर्गातील पालट अनुभवत असतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच हिंदु नववर्ष का साजरे करावे ? याविषयीचे शास्त्र जाणून हिंदु बांधवांनी समाजाचे आणि आपल्या धर्मबंधूंचे प्रबोधन करावे.’’