हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

मुंबई – हिंदु बांधवांनी भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली, म्हणून हा केवळ हिंदु धर्मियांचाच नव्हे, तर अखिल सृष्टीचा आरंभ दिन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतावर ब्रिटिशांची सत्ता असतांना ‘१ जानेवारी हाच नववर्षारंभ दिवस आहे’, असा अपसमज त्यांनी निर्माण केला. त्यामुळे स्वतंत्र भारतातही बहुतांश लोक १ जानेवारीला ख्रिस्ती नववर्ष साजरे करत पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहेत. शास्त्र समजून घेऊन भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे, हे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर अन् लाभदायी आहे. यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरातील विविध राज्यांत सोशल मिडिया, फलक प्रसिद्धी, व्याख्याने आदी माध्यमांतून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !