नेपाळचे पतंप्रधान १ एप्रिलपासून भारत दौऱ्यावर येणार

या वेळी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्री अन् नेते यांच्याशी चर्चा करणार आहेत.

चमोली (उत्तराखंड) येथे गायीचे लैंगिक शोषण करणाऱ्या धर्मांधाला अटक

अशा विकृत वासनांधांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होण्याचा धुळे येथील युवतींचा निर्धार !

येथे मागील दोन मासांत सात दिवसांच्या शौर्य जागरण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हिंदु राष्ट्राचे विचार रुजवण्यासाठी धुळे येथील कृष्णा रिसॉर्टमध्ये एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु सणांचा विषय आला की, सरकारच्या हाताला लकवा मारतो का ? – आशिष शेलार, नेते, भाजप

हिंदु सणांना अनुमती देण्याचा विषय आला की,  सरकारच्या हाताला लकवा मारतो का ?, असा प्रश्न भाजपचे नेते आणि आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी २९ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते तपोभूमी पिठाधीश सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांना पद्मश्री प्रदान

२८ मार्चला भारताचे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी श्री दत्त पद्मनाभ पिठाचे पिठाधीश्‍वर तथा आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांना पद्मश्री पुरस्कार २०२२ राष्ट्र्रपती भवन दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा पूर्ण क्षमतेने होणार !

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा पूर्ण क्षमतेने होणार आहे. यंदा कोरोना संसर्गाचे कोणतेही निर्बंध भाविकांना असणार नाहीत. १६ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून त्या दृष्टीने प्रशासनाने सिद्धता चालू केली आहे

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून उन्हाळी सुट्या रहित !

कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाली. आता शाळा चालू झाल्या असून अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मागणी करत आहेत.

आमदारांसाठी वेगळा गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाऊ नये ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबईमध्ये आमदारांसाठी ३०० घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर काही प्रसारमाध्यमांनी आमदारांना विनामूल्य घरे देण्यात येणार आहेत, अशी वृत्ते प्रसिद्ध केली होती.

नारायण राणे यांना अनधिकृत बांधकामासाठी पाठवलेली नोटीस मुंबई महानगरपालिकेने मागे घेतली !

नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेडून पाठवलेली नोटीस मागे घेतली आहे. प्रशासनाने नोटीस मागे घ्यावी, यासाठी राणे यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता.

पुण्यातील एका आस्थापनाला अवैध बांधकाम केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने १६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला !

पर्यावरण विभागाची पूर्वअनुमती न घेता अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ‘एकता हौसिंग प्रा.लि.’ या आस्थापनाला राष्ट्रीय हरित लवादाने अंतिम सुनावणीदरम्यान अनुमाने १५ कोटी ९९ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.