नारायण राणे यांना अनधिकृत बांधकामासाठी पाठवलेली नोटीस मुंबई महानगरपालिकेने मागे घेतली !

नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगला

मुंबई – नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेडून पाठवलेली नोटीस मागे घेतली आहे. प्रशासनाने नोटीस मागे घ्यावी, यासाठी राणे यांनी मुंबई पोलिसांकडे अर्ज केला होता. २२ मार्च या दिवशी सुनावणीच्या वेळी राणे यांना ८ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. कालावधी २९ मार्च या दिवशी संपुष्टात आला होता. न्यायालयात राणे यांनी महानगरपालिका प्रशासनाने बांधकाम अधिकृत करण्याची संधी दिली नसल्याचे म्हटले. त्यामुळे आता हे बांधकाम अधिकृत होण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे.