मुंबई – कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला होता, तो पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने एप्रिलमधील उन्हाळी सुटी रहित केली आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाली. आता शाळा चालू झाल्या असून अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मागणी करत आहेत. त्यानुसार एप्रिल मास आणि रविवारीही शाळा चालू रहाणार आहेत.