राष्ट्रपतींच्या हस्ते तपोभूमी पिठाधीश सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांना पद्मश्री प्रदान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा हस्ते पद्मश्री पुरस्कार २०२२ स्वीकारतांना सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

पणजी – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारद्वारे धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला होता. २८ मार्चला भारताचे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी श्री दत्त पद्मनाभ पिठाचे पिठाधीश्‍वर तथा आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांना पद्मश्री पुरस्कार २०२२ राष्ट्र्रपती भवन दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. ही गोव्याच्या, तसेच संप्रदायाच्या इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिण्याची गोष्ट आहे. या सोहळ्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत् प्रकाश नड्डा, तसेच विविध मान्यवरांसह श्री दत्त पद्मनाभ पिठाच्या संचालिका अँड्. ब्राह्मीदेवीजी, श्रीराज शेलार, महाप्रबंधक शुभक्षण नाईक, कृपाकांक्षी शशिकांत केरकर, उद्योजक रमेश फडते, विश्‍वजीत गावस आदी उपस्थित होते.