माजी आय.पी.एस्. अधिकारी रवींद्र पाटील यांनी अवैध मार्गाने २४० बिटकॉईन घेतले !

६ कोटी रुपये किमतीचे बिटकॉईन आणि इतर चलन शासनाधीन !

बिटकॉईन

पुणे – माजी आय.पी.एस्. अधिकारी रवींद्र पाटील यांनी कह्यात घेतलेल्या आरोपींकडील माहितीचा अपलाभ घेऊन २४० बिटकॉईन घेतल्याची माहिती अन्वेषणामध्ये समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आतापर्यंत ६ कोटी रुपये किमतीचे बिटकॉईन आणि इतर चलन शासनाधीन केले आहे. बिटकॉईन या आभासी चलनाच्या फसवणूक प्रकरणात पंकज घोडे आणि रवींद्र पाटील यांची सायबर तज्ञ म्हणून नेमणूक केली होती; मात्र त्यांनी गुन्ह्याच्या अन्वेषणात अटक केलेल्या आरोपींकडील माहितीचा अपलाभ घेऊन परस्पर बिटकॉईन घेतले. पाटील यांनी घेतलेले काही बिटकॉईन त्यांनी त्यांची पत्नी आणि भाऊ यांच्या नावावर पाठवल्याने या गुन्ह्यात दोघांनाही आरोपी केले जाण्याची शक्यता आहे, तर गुन्ह्यातील दुसरा आरोपी पंकज घोडे अन्वेषणात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या माहितीचे विश्लेषण चालू आहे.