कर्नाटकमधील पेजावर मठाचे अध्यक्ष स्वामी विश्व प्रसन्नातीर्थजी महाराज यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी घेतली भेट !

स्वामीजींना हिंदी ‘सनातन पंचांग २०२२’ आणि ग्रंथ भेट देण्यात आले. त्यांनी ‘मला सनातन संस्थेचे कार्य ठाऊक आहे’, असे सांगत साधकांना आशीर्वाद आणि प्रसाद दिला.

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ विषयावर मार्गदर्शन पार पडले !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.

आंदोलक झाडावर चढून आंदोलन करत असल्याने बीड प्रशासनाने ३ झाडे तोडली !

झाडावर चढून कुणी आंदोलन करू नये; म्हणून झाडच तोडणार्‍या प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्या योग्य पद्धतीने सोडवण्याची अपेक्षा काय करणार ?

शिवजयंतीनिमित्त फोंड्यात निघालेल्या भव्य शिवमहारथ यात्रेत ५ सहस्र शिवप्रेमींचा सहभाग

भगव्या ध्वजांसह फेटे घालून युवक, महिला आणि लहान मुले यांसह ५ सहस्र शिवप्रेमी या यात्रेत सहभागी झाले होते.

मार्चमध्ये महाराष्ट्र निर्बंधमुक्त ! – राजेश टोपे

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असून २१ फेब्रुवारी या दिवशी ८०६ कोरोनाचे नवे रुग्ण, तर ५३ ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली.

मुख्यमंत्री स्वतः मद्य घेत नाहीत, मग जनतेला का वाईन पाजत आहेत ? – रामदास आठवले, केंद्रीयमंत्री

२१ फेब्रुवारी या दिवशी बजाजनगर येथील आम्रपाली बुद्धविहारात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

शिवजयंती साजरी करू न देणार्‍या डोंबिवली येथील महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निदर्शने

या निवेदनात २१ मार्च यादिवशी तिथीनुसार असणारी शिवजयंती साजरी करण्याची मागणी केली. ही मागणी महाविद्यालयाच्या प्रशासनाने मान्य केली आहे. या वेळी मोठ्या संख्येने बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

‘सामान्यांना अनुक्रमाने, तर प्रभावी व्यक्तीला तातडीने सुनावणी’, अशासाठी न्यायव्यवस्था आहे का ?

मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन कर्मचारी आणि अधिवक्ता यांना फटकारले. न्यायालयाने नोंदवलेली टिपणी न्यायालयीन कामकाजाविषयी गंभीर असून याविषयी चौकशी होणे आवश्यक आहे !

दिशा सालियनच्या मृत्यूचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

दिशा सालियनच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले ? हे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल. यात कोण गुंतले आहे आणि कोण कारागृहात जाणार हे स्पष्ट होईल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

संभाव्य युद्धस्थिती आणि भारत !

सध्या फुटीरतावाद्यांनी भारतात कधी नव्हता इतका कहर केला आहे. आतंकी, धर्मांध, नक्षली, बोडो, खलिस्तानी, ‘तुकडे गँग’, पुरोगामी आणि त्यांना साथ देणारे हिंदुविरोधी राजकीय पक्ष अन् प्रसारमाध्यमे यांच्यामुळे ‘युद्धकाळात अंतर्गत शांतता बिघडली’, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. भारतियांनी प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणे आवश्यक !