दिशा सालियनच्या मृत्यूचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

डावीकडून चंद्रकांत पाटील आणि दिशा सालियन

कोल्हापूर, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – दिशा सालियनच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले ? हे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल. यात कोण गुंतले आहे आणि कोण कारागृहात जाणार हे स्पष्ट होईल, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

१. महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे किमान भावाचे मूल्य दोन तुकड्यांत देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकर्‍यांची प्रचंड हानी करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील, असा धोका आहे.

२. महाविकास आघाडी सरकारने राजकारणासाठी सत्ता आणि पोलीस यांचा दुरुपयोग चालवला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, यांसाठी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेणे अन् दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे.

३. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विविध शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेली एस्.टी.ची स्थानके आणि आगार यांच्या भूमी बळकावायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी संप चिघळवला आहे.