मथुरा (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील श्रीजी शिवाशा इस्टेट मंदिराच्या परिसरामध्ये ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर १३ फेब्रुवारी या दिवशी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी कुलदेवतेचा नामजप आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप यांचे महत्त्व सांगितले. तसेच धर्माचरणाचे महत्त्व, तिथीनुसार वाढदिवस साजरा करण्याचे लाभ आणि भारतीय संस्कृतीचे पालन करण्याचे महत्त्व विषद केले. या मार्गदर्शनाचा आणि या वेळी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.