
फोंडा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फोंडा येथील हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने भव्य शिवमहारथ यात्रा काढून शिवजयंती साजरी करण्यात आली. भगव्या ध्वजांसह फेटे घालून युवक, महिला आणि लहान मुले यांसह ५ सहस्र शिवप्रेमी या यात्रेत सहभागी झाले होते. यामुळे फोंड्यातील वातावरण शिवमय झाले होते. ‘कार्यातून माणसे जोडणे, हाच आमचा धर्म आहे’, असे या वेळी हिंदवी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले. फर्मागुडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पायी आणि दुचाकींसह निघालेल्या यात्रेला फर्मागुडी येथील किल्ल्यापासून आरंभ झाला. कुर्टी येथील नागा मशीद जंक्शन येथून कोटमार्गे दादा वैद्य चौक परिसरातून जुने बसस्थानक येथे यात्रेची सांगता करण्यात आली.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !