शाळांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह किंवा वस्तू यांचा प्रचार करू नये ! – कंगना राणावत, अभिनेत्री

शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना राणावत यांनी हिजाबविषयी वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत व्यक्त केली.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाविद्यालयाने हिजाब काढायला लावल्याने प्राध्यापिकेचे त्यागपत्र

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्‍यांनी देशातूनही निघून जावे, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !

नक्षलवाद्यांकडून गडचिरोली येथे वाहनांची जाळपोळ केल्याचा व्हिडिओ प्रसारित !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

युक्रेनमध्ये फुटीरतावाद्यांनी सुरक्षाप्रमुखांची चारचाकी गाडी बाँबद्वारे उडवली !

येथे रशियाचे समर्थक असणार्‍या युक्रेनमधील फुटीरतावाद्यांनी एका सुरक्षाप्रमुखाच्या चारचाकी गाडीमध्ये स्फोट घडवून आणला. तसेच एक गॅस पाईपलाईनही फोडण्यात आली.

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने सोलापूर ते भद्राचलम् (तेलंगाणा) सायकल यात्रा !

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निलमनगर भागातून ‘श्री भद्राधि कोदंडराम’ या संस्थेच्या वतीने सोलापूर ते श्री क्षेत्र भद्राचलम् (तेलंगाणा) अशा सायकल यात्रेला प्रारंभ केला आहे.

रशियाने आक्रमण केल्यास युक्रेनला साहाय्य करू ! – जो बायडेन

आम्हाला संघर्ष नको आहे; परंतु रशियाने जर युक्रेनवर आक्रमण केले, तर आम्ही युक्रेनला साहाय्य करू. युक्रेनवर आक्रमण करणे चुकीचे असून विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी रशिया उत्तरदायी राहील अशी चेतावणी देणारे ट्वीट जो बायडेन यांनी केले.

कॅनडामध्ये कोरोना निर्बंधांना विरोध करणार्‍या ट्रकचालकांना अटक

सरकारने आंदोलनकर्त्यांना दंड आणि कारागृहात टाकण्याची चेतावणी दिल्याने अमेरिकेच्या सीमेवरील चार ठिकाणांच्या आंदोलकांनी माघार घेतली होती; मात्र आंदोलनाचे मुख्य केंद्र असलेल्या ओटावा शहरातील आंदोलन ट्रकचालकांनी चालूच ठेवले होते.

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतले !

आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला १८ फेब्रुवारीला अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतले. आर्थिक अपहाराच्या प्रकरणी इक्बाल ठाणे येथील कारागृहात आहे.

शिरढोण (जिल्हा रायगड) येथे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी साजरी

आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी होती. त्यांचे जन्मगाव शिरढोण येथे क्रांतीज्योतीची मिरवणूक काढून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवरायांचे नुसते पुतळे उभे करून चालणार नाही, तर त्यांचे विचार आत्मसात् करावे लागतील ! – नाना पाटेकर, अभिनेते

छत्रपती शिवरायांचे नुसते पुतळे उभे करून चालणार नाही, तर आपल्याला महाराजांचे विचार आत्मसात् करावे लागतील, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यात पत्रकारांशी बोलतांना मांडले.