मुंबई – आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला १८ फेब्रुवारीला अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतले. आर्थिक अपहाराच्या प्रकरणी इक्बाल ठाणे येथील कारागृहात आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने नुकतीच दाऊदची बहीण हसिना पारकर, इक्बाल आणि गुंड छोटा शकील याचा मेहुणा यांच्या मुंबईतील १० मालमत्तांवर धाड टाकली. यानंतर गुन्हेगारी, अवैध मालमत्ता आणि हवाला व्यवहाराशी संबंधित आर्थिक अपहार, यांप्रकरणी इक्बाल याची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने अनुमती दिल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने इक्बाल याला कह्यात घेतले.