काशी आणि मथुरा मुक्त होऊन भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे ही मागणी
सोलापूर, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निलमनगर भागातून ‘श्री भद्राधि कोदंडराम’ या संस्थेच्या वतीने सोलापूर ते श्री क्षेत्र भद्राचलम् (तेलंगाणा) अशा सायकल यात्रेला प्रारंभ केला आहे. ‘काशी आणि मथुरा मुक्त होऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे’, असा संकल्प करून कार्यकर्त्यांनी ही सायकल यात्रा चालू केली आहे. १४ फेब्रुवारीपासून चालू करण्यात आलेल्या या यात्रेमध्ये कार्यकर्ते प्रतिदिन ६० ते ७० किलोमीटरचा प्रवास करत १० दिवसांमध्ये श्री क्षेत्र भद्राचलम् (तेलंगाणा) येथे पोचणार आहेत, अशी माहिती बजरंग दलाचे रवि बोल्ली यांनी दिली.
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा रस्ता मोकळा झाला. त्याप्रमाणे काशी आणि मथुरा येथील वादग्रस्त जागेचा निकाल लागावा आणि भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, या मागणीसाठी ही १० दिवसांची यात्रा काढण्यात आली आहे.