नक्षलवाद्यांकडून गडचिरोली येथे वाहनांची जाळपोळ केल्याचा व्हिडिओ प्रसारित !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

नक्षलवाद्यांनी केलेली वाहनांची जाळपोळ

गडचिरोली – जानेवारी मासात जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील इरपनार येथे नक्षलवाद्यांनी २० वाहने जाळली होती. अवैध मुरूम उत्खनन केले जाणार्‍या ठिकाणी दहशत पसरवण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही कृती केली आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

या घटनेचा व्हिडिओ स्वत: नक्षलवाद्यांनी प्रसारित केला आहे. त्यामध्ये नक्षलवादी ट्रॅक्टर आणि जेसीबीसह अन्य वाहने जाळतांना दिसत आहेत. या वेळी नक्षलवादी मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे त्यांच्याकडील असलेल्या शस्त्रांवरून स्पष्ट झाले आहे.