भाजप पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळी या सणांना विनामूल्य गॅस सिलिंडर आणि  विद्यार्थिनींना स्कूटी देणार ! – भाजपचे नेते राजनाथ सिंह यांची घोषणा

असे आमीष दाखवणे भाजपकडून अपेक्षित नाही.

समाजवादी पक्षाचे कर्णावती बाँबस्फोटांतील आरोपींशी संबंध !

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा आरोप
केंद्रीय मंत्र्यांनी केवळ आरोप न करता केंद्र सरकारला याची चौकशी करण्यास सांगून त्याचा पाठपुरावा करावा, असेच जनतेला वाटते !

केरळ सरकारमधील मंत्री केरळच्या लोकांच्या पैशांचा दुरुपयोग करत आहेत ! – राज्यपाल आरिफ महंमद खान

केंद्र सरकारने याची चौकशी करून सत्य देशासमोर आणावे !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घाला !  

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची केंद्र सरकारकडे मागणी

मडिकेरी (कर्नाटक) येथे हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिंनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला !

महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना ठार मारण्याची धमकी

भारताचा खेळाडू राजवर्धन हंगरगेकर याच्यावर वय लपवल्याचा आरोप !

राजवर्धनची पहिली ते सातवीपर्यंत शाळेत १० जानेवारी २००१ अशी जन्मदिनांक होती, तर आठवीत १० नोव्हेंबर २००२ अशी करण्यात आली. त्यामुळे ‘अंडर १९ वर्ल्ड कप’ दरम्यान राजवर्धनचे वय २१ वर्षे होते, जे नियमबाह्य आहे.

केडगाव (पुणे) येथे वीर सावरकर ग्रंथालय अन् वाचनालयाच्या स्थापनेच्या तपपूर्तीनिमित्त ४ दिवसांची व्याख्यानमाला पार पडली

वीर सावरकर ग्रंथालय आणि वाचनालय यांच्या स्थापनेला दासबोध जयंतीच्या दिवशी १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वाचनालयाच्या वतीने केडगाव येथे १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत तपपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला.

महापालिका निवडणुकीसाठी केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर साडेतीन सहस्र हरकती- सूचना प्राप्त !

लोकसंख्येच्या निकषाचे पालन झालेले नाही, प्रभाग रचना करतांना समानता दिसत नाही, सोसायट्यांचे भाग तोडण्यात आले आहेत, असे आक्षेप हरकती-सूचनांद्वारे नोंदवण्यात आले आहेत.

 एकनाथ खडसे यांच्या जावयाचा आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला

पुण्यातील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा नोंद आहे. याच प्रकरणात गिरीश चौधरी यांना मागील वर्षी अटक केली होती, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वेगळेपण !

‘त्याग करायला एक तरी दैनिक शिकवते का ? केवळ ‘सनातन प्रभात’ शिकवते. त्यामुळे ‘सनातन प्रभात’च्या वाचकांची अध्यात्मात प्रगती होते, तर इतर दैनिकांचे वाचक मायेत अडकतात.’