केंद्रशासित दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथेही करण्यात आला गोहत्या बंदी कायदा !

देशातील अनेक राज्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचा कायदा बनवला आहे; मात्र त्याची कठोरपणे आणि प्रामाणिकपणे कार्यवाही केली जात नसल्याने गोहत्या थांबलेल्या नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. याकडे शासनकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

दमण – दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशांतही गोहत्या बंदी कायदा करण्यात आला आहे. गोहत्या करणार्‍याला १० वर्षे कारावास ते आजन्म जन्मठेप, अशी शिक्षा होऊ शकते, तसेच १ ते ५ लाख रुपयांपर्यंतच दंडही ठोठावला जाऊ शकतो. या कायद्यामध्ये गाय, वासरू, बैल आदींचा समावेश करण्यात आला आहे. येथे गोमांसावर पूर्णपणे बंदी असून गोहत्येसाठी गोवंशांची वाहतूकही अवैध ठरवण्यात आली आहे. या संदर्भातील गुन्हे अजामीनपात्र असतील. १५ वर्षांवरील प्राण्यांसाठी हा कायदा लागू असणार नसेल.