देहली येथे हिंदु व्यक्तीच्या बहिणीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाने कारागृहातून सुटल्यावर केली सदर हिंदु व्यक्तीची हत्या !

देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देहलीमधील पोलीस केंद्र सरकारच्या नियंत्रणात असतांना तेथे पोलिसांचा वचक नाही, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – येथील सुलतानपुरी भागामध्ये हीरालाल गुजराती (वय ३८ वर्षे) यांची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी इरफान आणि त्याचा भाऊ शानू यांना अटक केली आहे. इरफान याने हीरालाल यांच्या बहिणीवर बलात्कार केला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने हीरालाल यांची हत्या केली. १७ जानेवारी या दिवशी इरफान आणि शानू यांनी हीरालाल अन् नरसिंह या दोघांवर चाकूने वार केले, तसेच त्यांच्यावर गोळ्याही झाडल्या होत्या. दोघांना रुग्णालयात भरती केल्यानंतर उपचाराच्या वेळी हीरालाल यांचा मृत्यू झाला, तर नरसिंह यांच्यावर अद्याप उपचार चालू आहेत.