इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार ! – पंतप्रधान

नवी देहली – देहलीतील ‘इंडिया गेट’ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दिली. मोदी यांनी म्हटले आहे की, २३ जानेवारी या दिवशी नेताजी बोस यांची १२५ वी जयंती आहे. येथे ग्रेनाईटपासून बनवलेला भव्य पुतळा इंडिया गेटवर स्थापित करण्यात येणार आहे. हा पुतळा त्यांच्याविषयी भारत ऋणी असल्याचे प्रतीक असणार आहे. जोपर्यंत पुतळा बनून पूर्ण होत नाही, तोपर्यंत २३ जानेवारीपासून येथे ‘होलोग्राम’ (लेझर किरणांद्वारे निर्माण करण्यात आलेली त्रिमितीय प्रतिमा) प्रतिमा असणार आहे. याचे उद्घाटन २३ जानेवारीला करण्यात येईल.