सुराना (मध्यप्रदेश) येथील धर्मांधांवर कारवाई झाल्यानंतर हिंदूंकडून पलायन करण्याची चेतावणी मागे !

  • धर्मांधांच्या अवैध बांधकामांवर प्रशासनाकडून कारवाई

  • ३ धर्मांधांना अटक

मध्यप्रदेशातील भाजप सरकारने हिंदूंवरील अत्याचारांची तात्काळ नोंद घेत कारवाई करून त्यांना आश्‍वास्त केल्यासाठी अभिनंदन; मात्र भाजपच्या राज्यात धर्मांधांना हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडण्याची स्थिती निर्माण करण्याचे धाडसच होणार नाही, असा वचक सरकारने निर्माण केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

‘घर विकणे आहे’ असे लिहिलेले पुसून टाकलेले घर

रतलाम (मध्यप्रदेश) – येथील सुराना गावामध्ये धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंनी पलायन करण्याची चेतावणी दिल्यानंतर प्रशासन सक्रीय झाले. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी स्थानिक प्रशासनाला गावामध्ये पाठवून अहवाल मागवला. त्यानंतर प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर आता हिंदूंनी पलायनाची चेतावणी मागे घेत घरांवर ‘घर विकणे आहे’ असे लिहिलेलेही पुसून टाकले.

१. रतलामचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी सुराना गावामध्ये जाऊन माहिती घेतली. जिल्हाधिकारी कुमार पुरुषोत्तम म्हणाले की, गावामध्ये दोन लोकांमध्ये अतिक्रमणावरून वाद झाला होता. मी आणि पोलीस अधीक्षक गौरव तिवारी तेथे गेलो. आम्ही अतिक्रमणावर कारवाई करण्याचा आदेश देत तेथे तात्पुरती पोलीस चौकी स्थापन केली. त्यामुळे आता कुणालाही पलायन करण्याची आवश्यकता नाही.

२. हिंदूंनी केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने शहजाद अली याने येथील नाल्यावर बांधलेली अनधिकृत घरे पाडून टाकली, तसेच या प्रकरणी मयूर खान, शेरू उपाख्य शेर अली आणि हैदर अली यांना अटक केली.