काश्मीरमध्ये ६ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून आतंकवाद्यांना प्रतिदिन ठार करण्यात येणे, ही चांगली गोष्ट आहे; मात्र अशा प्रकारे आतंकवाद्यांना ठार करूनही काश्मीरधील आतंकवाद संपलेला नाही आणि संपण्याची शक्यता नाही; कारण जोपर्यंत त्यांच्या निर्मात्या पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत आतंकवादी येतच रहाणार, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षादलांनी ६ आतंकवाद्यांना ठार केले. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी घायाळ झाला. ठार झालेले आतंकवादी जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेशी संबंधित होते. यांतील दोघे पाकिस्तानी असून इतर दोघे स्थानिक आहेत, तर अन्य दोघांची ओळख पटवण्याचे काम चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.