‘हलाल जिहाद’च्या षड्यंत्राविषयी माझ्या कार्यक्रमांतून जनजागृती करेन ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज (डावीकडे) यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना श्री. मनोज खाडये

सोलापूर, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – सध्या भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ प्रमाणित करण्याची मागणी होत असून आता ती केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी उत्पादनेही हलाल नामांकित असावीत, अशीही मागणी मुसलमान करत आहेत. या जागतिक षड्यंत्राविषयी मला कोणतीही माहिती नव्हती; मात्र यापुढे मी माझ्या कार्यक्रमांतून याविषयी जागृती करेन, असे आश्वासन ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’चे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांच्याशी ‘हलाल जिहादच्या माध्यमातून समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे जागतिक षड्यंत्र’ या विषयावर चर्चा करत होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी, धर्मप्रेमी श्री. दुर्गनाथ देशमुख यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी इंगळे महाराज यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले. श्री. मनोज खाडये म्हणाले, ‘‘हलाल अर्थव्यवस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेइतका म्हणजे २ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पाही गाठला आहे. हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे हे जागतिक षड्यंत्र असून कीर्तनकारांच्या माध्यमातून याविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यात यावी.’’