|
पोलीस आयुक्तांची चेतावणी
पुणे – शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांना आळा घालण्याच्या सूचना वेळोवेळी पोलीस ठाणे प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या हद्दीत कोणताही अवैध धंदा चालू नाही, असे प्रतिज्ञापत्रही लिहून घेण्यात आले आहे. तरीही काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे चालू आहेत. ‘अवैध धंदे चालू असल्याचे आढळून आल्यास संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करणार’, अशी चेतावणी पोलीस आयुक्तांनी दिली आहे. पोलीस कर्मचारी लाच घेतांना आढळल्यास वरिष्ठांनाच उत्तरदायी धरण्यात येणार आहे.