अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जन्मदिनी ‘कमला पसंद’ या पान मसाल्याच्या विज्ञापनातून घेतली माघार !

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ११ ऑक्टोबरला त्यांच्या जन्मदिनी ‘कमला पसंद’ या पान मसाल्याच्या विज्ञापनातून माघार घेतली आहे. त्यांनीया उत्पादनाच्या आस्थापनाशी असलेला याविषयीचा करार रहित केला आहे.

गडचिरोली येथे जहाल नक्षलवादी अजय हिचामी याला अटक !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश !

शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार ! – संजय राऊत

शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेला दसरा मेळावा यावर्षी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

अपहाराचा ठपका असलेल्या वाहकाचे त्याच आगारात पुन्हा स्थानांतर नाही !

अपहार करणार्‍या वाहकांचे इतरत्र स्थानांतर केल्यानंतर त्यांच्या वृत्तीत चांगला फरक पडेल, याची शाश्वती नसते. त्यामुळे अशा भ्रष्ट वाहकांना कायमस्वरूपी बडतर्फ केले पाहिजे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे

लखीमपूर (उत्तरप्रदेश) येथील हिंसाचाराच्या प्रकरणी केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला संमिश्र प्रतिसाद; मात्र भाजपचा विरोध !

मुंबई आणि ठाणे येथे नागरिकांचे हाल ! काँग्रेसचे राजभवनावर मूक आंदोलन, वरणगाव (जिल्हा जळगाव) येथे महाविकास आघाडी आणि भाजप पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी !

षष्ठीला श्री महालक्ष्मीदेवीची गरुड वैष्णवी रूपात अलंकार पूजा !

षष्ठीला श्री महालक्ष्मीदेवीची गरुड वैष्णवी रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर श्री जोतिबा देवाची सोहम कमळातील राजेशाही खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.

वाळकेश्वर (मुंबई) येथील बाणगंगा कुंडातील सहस्रावधी मासे मृत

देवस्थान आणि महानगरपालिका प्रशासन यांनी एकत्रितरित्या येथे स्वच्छता राखण्याविषयी धोरण ठरवणे आवश्यक आहे; अन्यथा हिंदूंच्या धार्मिक विधींविषयी समाजातही चुकीचा संदेश जाईल !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी ‘सीबीआय’ची तिसर्‍यांदा धाड ! 

गेल्या १ मासापासून अनिल देशमुख बेपत्ता आहेत. ते कुठे आहेत ? याचा थांगपत्ता लागत नाही. केवळ देशमुख नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील काही मंडळींचा पत्ता नाही

हिंदु धर्माचा अभ्यास करून चुकीच्या आक्षेपांचे खंडण करा ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मागील काही वर्षांपासून हिंदु धर्म आणि आपला इतिहास यांविषयी सतत अपसमज पसरवले जात आहेत. आपल्या धर्मग्रंथांची उपेक्षा केली जात आहे. असेच चालू राहिले, तर आपले अस्तित्व टिकवता येणार नाही. आपल्या धर्मावरील चुकीचे आक्षेप खपवून घेऊ नका.

नाशिक येथे मराठी साहित्य संमेलन १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार !

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या ७ मासांपासून लांबलेले ९४ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर होणार आहे. त्यानुसार सिद्धते करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समित्यांना दिल्या आहेत.