आदिशक्तीने ‘रक्तबीज’ असुराला कसे मारले ?

कालीने रक्तबिजाच्या शरिरातून बाहेर पडणारे सर्व रक्त प्यायला आरंभ केला. देवीने रक्तबिजाच्या शरिराचे एक एक अंग कापायला आरंभ केला आणि देवी काली ते कापलेले अंग खात होती. त्यानंतर कालीने संपूर्ण रक्तबिजाला खाऊन टाकले.

शक्तिदेवता !

कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन म्हणजे त्यांचा संकल्पच असून साधकांनी त्यानुसार कृती केल्यास त्यांची तशी वृत्ती बनते’. श्री. नीलेश नागरे !

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी केलेले मार्गदर्शन, म्हणजे त्यांचा संकल्पच आहे’, असे वाटणे व ‘ती आतूनच आपोआप होत आहे’, असे लक्षात येणे.

नवरात्रीसारखे उत्सव साजरे करण्यासाठी देवीला चांगली गुणवत्ता असलेले पूजासाहित्य अर्पण करा !

एकदा मी पूजेसाठी तिळाचे तेल घेण्यासाठी दुकानात गेले असता दुकानदाराने मला विचारले, ‘‘चांगल्या गुणवत्तेचे तेल पाहिजे का ?’’ मी त्यांना ‘‘याचा अर्थ काय ?’’, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘काही जणांना पूजेसाठी अल्प मूल्य असणारे साहित्य हवे असते. त्यामुळे आम्हाला सर्व प्रकारचे साहित्य ठेवावे लागते.’’

नाशिक येथील श्री. नीलेश नागरे (वय ४० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. नीलेश नागरे (वय ४१ वर्षे, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी) यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांनी त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्येही या वेळी सांगितली.

श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापना-विधीच्या वेळी मिळालेल्या दैवी प्रचीतींच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्याला बळ पुरवण्यासाठी श्री भवानीदेवी सनातनच्या आश्रमात विराजमान झाली. प्रतिष्ठापना-विधीच्या वेळी मिळालेल्या दैवी प्रचीतींच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

‘अष्टम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’शी संबंधित सेवा करतांना रामनाथी आश्रमातील श्री. विक्रम डोंगरे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘अष्टम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सेवा करतांना विक्रमदादांनी सेवा करणार्‍या साधकांना सेवेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यामुळे सर्व साधक गांभीर्याने सेवा करू लागले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. निर्मयी मंदार मांजरेकर (वय २ वर्षे) !

चि. निर्मयी मंदार मांजरेकर हिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर तिच्या आई-वडिलांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे अन् तिच्या अन्य नातेवाईकांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

‘१९.१.२०२० ते २१.१.२०२० या दिवसांत रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे आगमन, पूजा आणि प्रतिष्ठापना हे कार्यक्रम पार पडले. त्या वेळी मला देवीची मूर्ती उचलण्याची सेवा होती. ही सेवा मिळाल्यामुळे मला आनंद झाला आणि कृतज्ञता वाटली. आमच्याकडून देवीच्या चरणी प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत होत्या. ही सेवा करतांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.