कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश ! – संपादक
गडचिरोली – २ लाख रुपयांचे पारितोषिक असलेला जहाल नक्षलवादी अजय हिचामी याला (वय ३० वर्षे) गडचिरोली पोलिसांनी ११ ऑक्टोबर या दिवशी अटक केली. जिल्ह्यातील अहेरी येथील अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वाखाली गट्टा (जा.) अरण्य परिसरात पोलीस नक्षलविरोधी अभियान राबवत होते, त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
नक्षलदृष्ट्या अतीसंवेदनशील झारेवाडा येथील रहिवासी असलेला अजय हिचामी हा वर्ष २०१९ मध्ये गट्टा नक्षलदलममध्ये भरती होऊन तो सशस्त्र दलमचा सदस्य या पदावर कार्यरत होता, तसेच तो नक्षलींच्या कारवाई पथकाचा सदस्य होता. वर्ष २०२१ मध्ये बुर्गी साहाय्य केंद्र गट्टावर २ वेळा झालेल्या आक्रमणात त्याचा समावेश होता, तसेच १८ सप्टेंबर या दिवशी सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक यांच्या हत्येमध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. वर्ष २०१९ ते आजपर्यंत त्याच्यावर एकूण ३ हत्या, ५ चकमकी आणि १ दरोडा असे एकूण ९ गंभीर गुन्हे नोंद आहेत.