मुंबई – प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ११ ऑक्टोबरला त्यांच्या जन्मदिनी ‘कमला पसंद’ या पान मसाल्याच्या विज्ञापनातून माघार घेतली आहे. त्यांनीया उत्पादनाच्या आस्थापनाशी असलेला याविषयीचा करार रहित केला आहे. तसेच आस्थापनाकडून घेतलेले मानधनही परत केले आहे. त्यांनी हा निर्णय सामाजिक माध्यमांतून घोषित केला. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. अमिताभ बच्चन यांनी या विज्ञापनात काम केल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. (टीका झाल्यावर विज्ञापनातून माघार घेणारे नव्हे, तर सामाजिक भान राखून अशा पान मसाल्याच्या विज्ञापनातून माघार घेणे आवश्यक ! – संपादक)