मुंबई – शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेला दसरा मेळावा यावर्षी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. या मेळाव्याला मुंबईतील काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसेच महापौर उपस्थित रहाणार आहेत. सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. यापूर्वी शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होत होता; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी हा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने साजरा झाला होता.