‘भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालेच, तर भारताचा पराभव निश्‍चित !’ – चीनच्या सरकारी दैनिकाची दर्पोक्ती

रावणामध्येही असाच अहंकार होता आणि मग त्याचा नाश झाला. चीनचाही हा अहंकार भारताने लवकरात लवकर आक्रमक भूमिका घेऊन नष्ट करण्याची आवश्यकता आहे. चीन एक वायू भरलेला फुगा असून त्याला टाचणी लावण्याचे काम भारतानेच केले पाहिजे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

१२ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (सहावा दिवस)

हे देवी नारायणी, तुला शरण आलेल्या दीन, दुःखी भक्तांचे तू रक्षण करतेस, तसेच त्यांची सर्व दुःखे नाहीशी करतेस, तुला आमचा नमस्कार असो.

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

पितृपक्षानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम

गुरुग्राम (हरियाणा) येथे मोकळ्या जागेत अवैधरित्या नमाजपठण करणार्‍यांच्या विरोधात हिंदु महिलांचे आंदोलन !

धर्मांधांवर कारवाई करावी लागू नये, यासाठी ‘हिंदूंनी नमाजपठणाची अनुमती दिली’, असे खोटे सांगणार्‍या पोलिसांवर कारवाई करणे आवश्यक !

अजित पवार यांच्याशी संबंधित जयपूर येथील हॉटेल समुहावर आयकर विभागाच्या धाडी !

आयकर विभागाच्या पथकाने येथील एका मोठ्या हॉटेल समुहावर धाडी टाकल्या असून हे प्रकरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सहकारी यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

ऑनलाईन फसवणुकीची माहिती तात्काळ बँकेला दिल्यास पूर्ण रक्कम परत मिळवू शकता ! – रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, कुणासमवेत ऑनलाईन फसवणूक झाली असेल, तर पूर्ण पैसे परत मिळवू शकतो; मात्र यासाठी सतर्क रहाणे आवश्यक आहे. फसवणुकीविषयी बँकेला त्वरित माहिती देणे आवश्यक आहे.

नागपूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर होणारे सर्व कार्यक्रम रहित !

येथे दसर्‍याच्या दिवशी दोन मोठे आणि महत्त्वाचे सोहळे आयोजित केले जातात. यामध्ये आंबेडकरी अनुयायांसाठी ‘दीक्षाभूमी सोहळा’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दसर्‍याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे केले जाणार आहेत.