वॉशिंग्टन (अमेरिका) – जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधात्मक लस ‘आर्टीएस्, एस/एएस्०१’ला मान्यता दिली आहे. मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या आफ्रिकी देशांना प्रथम ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य देशांनी या लसीचा वापर करायचा कि नाही, हे स्वतःच ठरवायचे आहे.
“From a scientific perspective this is a massive breakthrough.”
The World Health Organization has endorsed the RTS,S/AS01 malaria vaccine, the first against the mosquito-borne disease that kills more than 400,000 people a year, mostly African children.https://t.co/8htnzOvxkY
— ABS-CBN News Channel (@ANCALERTS) October 6, 2021
५ वर्षांखालील मुलांना मलेरिया होण्याचा सर्वाधिक धोका असतो. प्रत्येक २ मिनिटांनी मलेरियामुळे एका मुलाचा मृत्यू होतो. वर्ष २०१९ मध्ये जगभरात मलेरियामुळे ४ लाख ९ सहस्र लोकांचा मृत्यू झाला होता. त्यांपैकी ६७ टक्के म्हणजेच २ लाक ७४ सहस्र मुले होती. त्यांचे वय ५ वर्षांपेक्षा अल्प होते.