अमेरिकी सैन्याकडे ३ सहस्र ७५० अण्वस्त्रे !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अमेरिकी सैन्याकडे ३ सहस्र ७५० अण्वस्त्रे  होती. त्याआधीच्या वर्षी ही संख्या ३ सहस्र ८०५ होती, तर वर्ष २०१८ मध्ये ३ सहस्र ७८५ अण्वस्त्रे होती. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा प्रकारची आकेडवारी घोषित करण्यास बंदी घातली होती. ट्रम्प यांची सत्ता गेल्यानंतर आता बायडेन प्रशासनाने अण्वस्त्रांची संख्या घोषित केली. अण्वस्त्रसाठ्यांच्या माहितीत पारदर्शकता ठेवणे आवश्यक असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले.

वर्ष १९६७ मध्ये रशियासमवेतच्या शीतयुद्धानंतर हा आकडा सगळ्यात अल्प  आहे. शीतयुद्धाच्या या कालावधीत अमेरिकेजवळ एकूण ३१ सहस्र २५५ अण्वस्त्रे होती.