चर्च हे देवाचे निवासस्थान असल्याने ते युद्धाचे स्थान बनू नये ! – केरळ उच्च न्यायालय

‘ऑर्थोडॉक्स’ (पुराणमतवादी) चर्च आणि ‘जॅकोबाईट’ (फुटीर) चर्च यांच्यातील गटबाजीचे प्रकरण

‘मंदिरांमध्ये गैरव्यवहार होतात’, ‘व्यवस्थापन नीट नाही’, अशी कारणे देऊन त्यांचे सरकारीकरण करणारे शासनकर्ते गटबाजी असणार्‍या चर्चचे सरकारीकरण  करत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

थिरूवनंतपूरम् (केरळ) – चर्च हे देवाचे निवासस्थान असल्याने ते युद्धाचे स्थान बनू नये. तेथे होणार्‍या गटबाजीवर नियंत्रण आणावे, असे विधान केरळ उच्च न्यायालयाने  एका याचिकेवर सुनावणी करतांना केले. घटनेचे पालन करतांना ‘ऑर्थोडॉक्स’ चर्च आणि ‘जॅकोबाईट’ चर्च यांच्यातील गटबाजीमुळे मलंकारा सीरियन ऑर्थोडॉक्स चर्चशी संबंधित धार्मिक सेवांच्या वेळी पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर न्यायालयाने वरील विधान केले.

न्यायालयाने म्हटले की, मलंकारा सीरियन ऑर्थोडॉक्स चर्चशी संबंधित सर्वांनी घटनेचे पालन केले पाहिजे. कोणत्याही आदेशाचे पालन करण्यासाठी चर्चमध्ये पोलीस किंवा अन्य दलांना पाठवण्यास आम्हाला आनंद होणार नाही; मात्र जर आम्हाला बाध्य केले जात असेल, तर असा आदेश द्यावा लागू शकतो.