आरोपींवर काय कारवाई केली, याविषयीचा अहवाल सादर करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला आदेश

लखीमपूर खीरी (उत्तरप्रदेश) येथील हिंसाचाराचे प्रकरण

नवी देहली – लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणातील आरोपींवर काही कारवाई झाली आहे कि नाही याविषयीचा अहवाल सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला दिला आहे. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

१. न्यायालयाने म्हटले की, ज्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे, त्यांना तुम्ही अटक केली आहे कि नाही हे आम्हाला ठाऊक असणे आवश्यक आहे.

२. उत्तरप्रदेश सरकारने या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.