(म्हणे) ‘गोडसे केवळ ‘सुपारी किलर’ असून तो सावरकरांच्या डोक्याने चालायचा !’ – अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

गोडसे यांचा एकेरी उल्लेख करून, त्यांच्याविषयी अपशब्द बोलून आणि गांधी यांनी केलेल्या चुकांचे उदात्तीकरण करून इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांना काय म्हणावे ? – संपादक

‘नथुराम गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्‍यांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे ! – खासदार वरुण गांधी, भाजप

‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी काहीही बोलू शकतो’, असे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हे हिंदूंच्या देवतांचा अथवा श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर लगेच म्हणतात, तर मग नथुराम गोडसे यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल, तर त्या वेळी त्यांची भूमिका उलट का असते ?

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद असूनही मंदिर समितीने छुप्या पद्धतीने लोकांना दर्शनासाठी आत सोडले ! – गणेश लंके, अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती

सरकारीकरण झालेल्या मंदिरात नियमांचा असाच फज्जा उडणार यात शंकाच नाही; म्हणून मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करणे आवश्यक आहे !

विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक यंत्रणा गतीमान : मतदार सूचींच्या पुनर्निरीक्षणाचे वेळापत्रक घोषित

वर्ष २०२२ मध्ये जानेवारी मासाच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्यनकडे मिळाले १ लाख ३३ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ

नैतिक मूल्ये, धर्मशिक्षण यांच्या अभावामुळे युवा पिढी शाहरुख खान यांच्यासारख्या चित्रपट कलाकारांना आदर्श मानते. आता शाहरुख यांच्याच मुलावर असलेल्या गंभीर आरोपांतून तरी युवकांनी आपले आदर्श कोण असायला हवेत, याचा अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक !

पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथील संतपिठात ५ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश चालू; वयाची अट नाही !

संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या पैठण येथील संतपिठात एकूण ५ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश चालू आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २० आहे. यंदा संतपिठात अधिकाधिक १०० जणांना संत परंपरेचे धडे दिले जाऊ शकतात.

किल्ले विशाळगड येथे झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देणार्‍या लोकांवर कारवाई करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना कोल्हापूर यांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृतीच्या समिती’ने चालू केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने तेथील अवैध बांधकामे करणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत आहेत.

अमली पदार्थ व्यवसायाच्या विरोधात कठोर कारवाई करा ! – आलेक्स रेजिनाल्ड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी गोव्यातील अमली पदार्थ व्यवसाय आणि नियमांचे उल्लंघन करणारे पर्यटक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

‘कॉर्डेलिया क्रूझ’च्या दुसर्‍या झडतीत आणखी ८ जणांना अटक !

अमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी का अडकत आहे, हे पोलिसांनी शोधावे !

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली घोषित !

राज्य सरकारने मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा आणि दांडिया यांच्या आयोजनावर बंदी घातली आहे. तसेच देवीच्या मूर्तीची उंची आणि मंडपाचा आकार यांवरही निर्बंध घातले आहेत.