नैतिक मूल्ये, धर्मशिक्षण यांच्या अभावामुळे युवा पिढी शाहरुख खान यांच्यासारख्या चित्रपट कलाकारांना आदर्श मानते. आता शाहरुख यांच्याच मुलावर असलेल्या गंभीर आरोपांतून तरी युवकांनी आपले आदर्श कोण असायला हवेत, याचा अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक ! – संपादक
मुंबई – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ‘कॉर्डेलिया क्रूझ’ नावाच्या जहाजावर टाकलेल्या धाडीत अटक करण्यात आलेल्या आर्यन खान याच्याकडे १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या २२ गोळ्या मिळाल्या. या सर्वांचे मूल्य १ लाख ३३ सहस्र रुपये इतके आहे. ही माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकार्यांकडून देण्यात आली.
या धाडीत कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमए आदी अमली पदार्थ आढळले. सॅनिटरी पॅड, हँडबॅग, शर्टच्या बाह्या यांमधून हे अमली पदार्थ ‘क्रूझ’वर नेण्यात आले होते. आर्यन खान याने ४ वर्षांपासून अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची स्वीकृती त्याने स्वत: दिली आहे. त्याने डोळ्यांना लावायच्या ‘लेन्स’च्या डबीतून अमली पदार्थ नेले होते. आर्यनच्या भ्रमणभाषवरून अमली पदार्थांच्या पुरवठादारांना केलेले संदेश सापडले आहेत, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकार्यांकडून देण्यात आली.