पणजी, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी गोव्यातील अमली पदार्थ व्यवसाय आणि नियमांचे उल्लंघन करणारे पर्यटक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या पत्रात ते पुढे म्हणतात, ‘‘राज्यात प्रवेश करणारे अनेक पर्यटक नियमांचे उल्लंघन करत आहेत.’’
आमदार आलेक्स रेजिनाल्ड पितृपक्ष संपल्यानंतर आपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा
मडगाव – गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड काँग्रेस सोडून ‘आम आदमी’ पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांचा ५ ऑक्टोबर या दिवशी वाढदिवस आहे; मात्र वाढदिनी ‘आप’मध्ये सहभागी होण्याऐवजी पितृपक्षानंतर म्हणजे ८ ऑक्टोबर या दिवशी आमदार रेजिनाल्ड ‘आप’मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वृत्ताविषयी प्रतिक्रिया देतांना आमदार रेजिनाल्ड म्हणाले, ‘‘मी माझ्या लोकांशी चर्चा करत आहे आणि त्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईन.’’