बागपत येथे धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचे धर्मांतर करत गोमांस खाऊ घातले !

अशा वासनांध धर्मांधांना कठोर शिक्षा करण्याची मागणी समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, साम्यवादी आदी राजकीय पक्ष, तसेच पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी का करत नाहीत ?

प्रतिकात्मक छायाचित्र

बागपत (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यामध्ये एका १५ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार, धर्मांतर आणि गोमांस खाऊ घालण्याच्या प्रकरणी पोलिसांनी शहजाद आणि त्याचे आई-वडील यांना अटक केली. ही मुलगी ७ मासांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यावर ही घटना उघड झाली.