गर्भपाताच्या औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ दिवसांत राज्यात १४ गुन्ह्यांची नोंद !

मुंबई – गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री केल्याप्रकरणी २६ जून ते ९ जुलै या कालावधीत राज्यात १४ गुन्हे नोंदवण्यात आले असून या प्रकरणी ११ जणांना अटक झाली आहे. ३४८ ठिकाणी औषध नियंत्रक प्राधिकरणाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये ४७ सहस्र ४७८ किमतीची औषधे कह्यात येण्यात आली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि संभाजीनगर येथे या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.