गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील प्रश्नोत्तराच्या विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा सहभाग !

कार्यक्रम २३ जुलै या दिवशी प्रसारित होणार !

पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

चेन्नई – गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. बालाजी यांनी सहभाग घेतला. ‘श्री टी.व्ही.’च्या कु. साई निखिला यांनी विचारलेल्या प्रश्नांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी उत्तरे दिली. या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे २३ जुलै या दिवशी करण्यात येणार आहे.

या वेळी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावतीने २४ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवाची सविस्तर माहितीही दिली.

क्षणचित्रे

१. प्रश्नोत्तराच्या या विशेष कार्यक्रमानंतर ‘श्री टी.व्ही.’चे श्री. बालागौतम यांनी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना प्रश्नोत्तराचे असे कार्यक्रम नियमित करण्याची विनंती केली.

२. कार्यक्रम संपल्यानंतर कु. निखिला यांनी ‘मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या’, असा अभिप्राय व्यक्त केला, तसेच त्यांनी सनातनच्या सत्संगांना उपस्थित रहाण्याची सिद्धता दर्शवली.