मनोरंजन विश्व हे सक्षम मूल्ये आणि विवेक यांच्या आधारे सिद्ध करण्याची आवश्यकता ! – अभिनेत्री कंगना राणावत

अभिनेत्री कंगना राणावत

मुंबई – आपल्याला मनोरंजन विश्व हे सक्षम मूल्ये आणि विवेक यांच्या आधारे सिद्ध करण्याची आवश्यकता आहे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत यांनी व्यक्त केले. अश्लील व्हिडिओ चित्रित करून त्यांचे संकेतस्थळांवर प्रसारण केल्याच्या प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. याविषयी कंगना राणावत यांनी ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून वरील मत व्यक्त केले. ‘अशा विकृतींमुळेच मी चित्रपटसृष्टीला गटार म्हणते’, अशीही संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यांनी पुढे म्हटले आहे की, प्रत्येक चमकणारी वस्तू ही सोने नसते. माझ्या ‘निर्मिती संस्थे’द्वारे सिद्ध होणार्‍या चित्रपटातून या गोष्टी मी मांडणार आहे.