पूरस्थितीनंतर ३२ मार्गांवर वाहतूक चालू !

यामध्ये कोल्हापूर-पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर ४ दिवसांपासून अडकून पडलेल्या प्रवाशांनाही स्वत:च्या गावी सुखरूप पोचता आले आहे, अशी माहिती एस्.टी.च्या वाहतूक विभागाने दिली.

अनेक भागांत एकाच दिवसात ३२ इंच पाऊस झाल्याने पूर ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोल्हापुरात अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन अल्प आकाराच्या मोर्‍या आहेत. बर्‍याचदा गाळ, दगड किंवा झाडे वाहून आल्यामुळे या मोर्‍या बंद होतात.

पिंपरी (पुणे) येथे रेकी करून सोनाराची दुकाने लुटणार्‍या नेपाळी चोरांना अटक

१८ जून या दिवशी झालेल्या चोरीनंतर चालू असलेल्या अन्वेषणातून या चोरांना विविध जिल्ह्यांतून पकडण्यात आले आहे.

नागपूर येथे महापालिका प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकारी ऐकत नसल्याने नगरसेवक हतबल !

नगरसेवकांचे जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष !

साहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुण्यातील घरावर सीबीआयची धाड !

१०० कोटी रुपये वसुली प्रकरणी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे साहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुण्यातील घरावर २७ जुलैच्या रात्री केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) धाड घातली आहे….

आपत्काळात तातडीच्या बचावकार्यासाठी कोकणात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक नियुक्त करावे ! – कु. अदिती तटकरे, राज्य उद्योगमंत्री

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी मागील ५ वर्षांत ३ वेळा चक्रीवादळ आले होते. २-३ वेळा पूर आला होता. अशा वेळी स्थानिक पातळीवरील पथकांना बचावकार्य करण्यास अडचण येते.

ढगफुटीसदृश पावसामुळे राज्यातील पाण्याची चिंता मिटली !

८ दिवसांपूर्वी सर्व धरणांमध्ये सरासरी ३२ टक्के पाणीसाठा होता; मात्र एका आठवड्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे १६ टक्के पाणीसाठा वाढून तो ४८ टक्क्यांवर पोचला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नका ! – उच्च न्यायालयाचा ‘ईडी’ला आदेश

‘एन्.एस्.ई.एल्.’ आणि ‘टॉप सिक्युरिटी’ प्रकरणी २८ जुलै या दिवशी सुनावणी होणे अपेक्षित होते; परंतु न्यायालय सध्या परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांच्या याचिकांवर सुनावणी घेत आहे.

सामाजिक माध्यमांतून विचारले जाताहेत प्रश्न !

‘चिपळूणच्या या परिस्थितीला निसर्ग उत्तरदायी आहे’, असे म्हणून चालणार नाही. संबंधित शासनयंत्रणेला खडसवायला हवे.

कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणी तिसर्‍या आरोपीस अटक !

धर्मेंद्र रावत यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या आधी चंदन ठाकरे यांना, तर साप्ते यांना धमकावणार्‍या राकेश मौर्य यांना अटक केली.