‘टिळक महाराष्ट्र विद्यापिठा’च्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सनातनची युवासाधिका कु. आर्या श्रीश्रीमाळ हिचा तृतीय क्रमांक !

या स्पर्धेत महाराष्ट्रातील १०० शाळांमधून ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. कु. आर्या हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असून ती पुणे येथील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीत शिकत आहे.

कोकणातील आपत्तीग्रस्तांना साहाय्यासाठी एक मासाचे वेतन देणार ! – राधाकृष्ण विखे- पाटील, आमदार, भाजप

कोकणातील अतीवृष्टीग्रस्तांच्या साहाय्यासाठी स्वत:चे १ मासाचे वेतन देणार असल्याचे भाजपचे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. विखेंनी मतदारसंघात साहाय्य संकलित करण्यासही प्रारंभ केला आहे.

पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना आता सरपटणारे प्राणी आणि रोगराई यांची भीती !

पावसाचा जोर अल्प झाल्याने राज्यातील ग्रामीण भागात आलेला पूर ओसरला आहे; मात्र आता पूरग्रस्तांसमोर अन्य अनेक समस्या उभ्या आहेत. घरादारांतील चिखल काढत असतांना पूरग्रस्तांसमोर आता पुराच्या पाण्यासमवेत….

आपत्काळात राजकारण नको !

कोल्हापूरला आलेल्या महापुरात पूरग्रस्तांना अनेक लोकप्रतिनिधींनी साहाय्य पाठवले आहे. यातून सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधींनी बोध घेऊन, तसेच राजकारण थांबवून लोकांना साहाय्य करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे.

शहापूर (जिल्हा ठाणे) येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर लिपीक अटकेत !

तक्रारदाराच्या जमिनीच्या मोजणीमध्ये आलेल्या ३ गुंठे फरकाचा पंचनामा करून देण्यासाठी ५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी शहापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपीक पंडित गोखणे यांनी केली होती.

अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी हिंगोली येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक रवीकांत हुंडेकर यांचे निलंबन !

अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणार्‍या अशा पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाका !

सांगली येथे भाजप आणि श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने बाजारपेठेत स्वच्छता अभियान !

पूरग्रस्त हरभट रस्ता, कापड पेठ आणि मारुति रस्ता येथे भाजप आणि श्रीराम प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबवले. भाजपचे प्रदेश सदस्य शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काम केले. 

लाच स्वीकारतांना धाराशिव येथे महसूल विभागाच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासह एकाला अटक  

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे.

भारतातील निधर्मीवादी गप्प का ?

पाकिस्तानमध्ये अब्दुल सलाम दाऊद या व्यक्तीकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यानंतर पोलिसांनी अब्दुल याला अटक केली.

घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव

‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’