पिंपरी (पुणे) येथे रेकी करून सोनाराची दुकाने लुटणार्‍या नेपाळी चोरांना अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (पुणे) – रेकी करून सोनाराची दुकाने आणि अधिकोष लुटणार्‍या नेपाळी चोरांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा ‘युनिट ४’च्या पथकाने अटक केली आहे. १८ जून या दिवशी झालेल्या चोरीनंतर चालू असलेल्या अन्वेषणातून या चोरांना विविध जिल्ह्यांतून पकडण्यात आले आहे. ‘सोनारांचे किंवा तत्सम दुकान शोधून त्याच दुकानाशेजारी भाड्याने दुकान घ्यायचे आणि रात्री भिंत फोडून चोरी करायची’ अशी या टोळीची पद्धत होती. या आरोपींकडून १२ लाखांचा चोरीचा ऐवज कह्यात घेण्यात आला. सर्व चोर मूळचे नेपाळ येथील असल्याचे समोर आल्याने स्थानिक प्रशासनासमोर परदेशातून भारतात आलेल्या गुन्हेगारांना शोधून पकडणे, हे नवे आव्हान निर्माण झाले आहे.