गूगल, फेसबूक यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांवर ‘वैश्‍विक कर’ लागू होणार

जागतिक करप्रणालीत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनकने यांनी दिली.

गुजरातमध्ये ‘गाय संशोधन केंद्रा’ची स्थापना !

‘गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ने (‘जी.टी.यू.’ने) ‘गाय संशोधन केंद्राचा’ प्रारंभ केला आहे. गायीचे दूध, गोमूत्र आणि शेण यांच्या पारंपरिक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

सिकंदरा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्यात जाणार्‍या जमावाकडून पोलिसांवर आक्रमण

स्वतःचेही रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ? जमावाला पोलीस प्रत्युत्तरही देवू शकत नाहीत का ? त्यांना प्रशिक्षणात हेही शिकवले जात नाही का ?

वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता शासनाने तात्काळ ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे’ उभारावीत ! – सुराज्य अभियान

हिंदु जनजागृती समितीची ‘सुराज्य अभियाना’द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी. सरकारने वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारावीत.

बांधकाम व्यवसायिकाने वेळेवर घर न दिल्यास त्याला ग्राहकाला व्याजासह संपूर्ण रक्कम द्यावी लागणार ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

यासह संबंधित बांधकाम व्यवसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याला कारागृहातही टाकले पाहिजे, असे जनतेला वाटते !

बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या धर्मांध नेत्याला मारहाणीच्या प्रकरणी अटक

सत्ताधारी पक्षाचे नेते गुंडगिरी करणारे असतील, तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी चांगली राहील का ? अशा नेत्यांवर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार कारवाई करणार का ?

केरळमधील माकप आघाडी सरकारने लसीकरणाच्या प्राधान्य सूचीमध्ये हज यात्रेकरूंचाही केला समावेश !

कोरोनापासून सर्वांचेच रक्षण करणे अपेक्षित आहे; मात्र त्यात प्राधान्य देतांना सरकारने हिंदु यात्रेकरूंना अशाप्रकारे प्राधान्य दिले असते का ? असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो !

चीनमध्ये बेरोजगार तरुणाने संतापाच्या भरात चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात ६ जणांचा मृत्यू, तर १४ जण घायाळ

चीनमधील अनहुई प्रांतातील आनछिंग शहरामध्ये एका २५ वर्षीय बेरोजगार तरुणाने संतापाच्या भरात काही लोकांवर चाकूद्वारे आक्रमण केले. यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण घायाळ झाले.

पाकिस्तानी सैन्य ‘हमास’च्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देतेे ! – पाकच्या ज्येष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट

पाक सैन्य फार पूर्वीपासून हमासच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत असून त्यासाठी ‘स्पेशल कमांडो यूनिट’ची एक तुकडी काही वर्षांपासून येथे नियुक्त आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय यांमध्ये शिवराज्याभिषेकदिन ‘शिवस्वराज्यदिन’ म्हणून साजरा होणार ! – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.