पाकिस्तानी सैन्य ‘हमास’च्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देतेे ! – पाकच्या ज्येष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट

  • जे पाकिस्तानी सैन्य भारतात जिहादी आतंकवादी कारवाया करणार्‍या संघटनांच्या आतंकवाद्यांना गेली ३ दशके प्रशिक्षण देत आहे, तेच हमासच्या आतंकवाद्यांनाही प्रशिक्षण देत आहे, हे पाहाता आता पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करणेच आवश्यक आहे !
  • भारताने आता इस्रायलच्या साहाय्याने पाकवर कारवाई करण्याचा विचार केला पाहिजे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी सैन्य गाझा पट्टीमध्ये पॅलेस्टाईनच्या ‘हमास’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना सैनिकी प्रशिक्षण देत आहे, असा गौप्यस्फोट पाकचे ज्येष्ठ नेते राजा जफर उल् हक यांनी केला आहे. पाक सैन्य फार पूर्वीपासून हमासच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत असून त्यासाठी ‘स्पेशल कमांडो यूनिट’ची एक तुकडी काही वर्षांपासून येथे नियुक्त आहे, असेही त्यांनी सांगितले.

राजा जफर उल् हक पुढे म्हणाले की, मी जेव्हा ट्यूनिशिया येथे गेलो होतो, तेव्हा गाझामधील ‘फतह’ या पक्षाचा सहसंस्थापक अबू जिहाद (खलीद अल् वजीर) त्या वेळी जिवंत होता. माझी त्याच्याशी भेट घालून देण्यात आली. तेव्हा तो म्हणाला की, आमचे जेव्हा कधी इस्रायलशी युद्ध होते, तेव्हा पाकने प्रशिक्षण दिलेले आमचे तरुण पुढे असतात.