बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या धर्मांध नेत्याला मारहाणीच्या प्रकरणी अटक

सत्ताधारी पक्षाचे नेते गुंडगिरी करणारे असतील, तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी चांगली राहील का ? अशा नेत्यांवर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार कारवाई करणार का ?

डावीकडून महंमद गजनफर हुसेन

मुझफ्फरपूर (बिहार) – येथील संयुक्त जनता दलाचे नेते महंमद गजनफर हुसेन यांना त्यांचे व्यावसायिक भागीदार विकास तिवारी, त्यांचे वाहनचालक आणि अन्य एक अशांना  अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यासह हुसेन यांच्या अन्य दोघा साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. या मारहाणीच्या वेळी तिवारी यांच्यासह त्यांचे वाहनचालक आणि अन्य एक जण यांची नखे काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.